Share

महाराष्ट्र पोलिसांसाठी गृहमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. राज्यात पोलिसांसाठी घरं कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थान उद्धाटन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला त्याला ४ एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरं महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घर बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन पोलीस विभागातूनच घर बांधली जाईल, असेही अनिल देशमुख म्हणाले. येत्या २६ तारखेपासून जेल टुरिझमला सुरुवात होईल. येरवडा जेलसोबत महात्मा गांधींच्या आठवणी आहे. येरवडानंतर इतर जेलमध्ये सुद्धा हे करण्यात येणार आहे. जेल कसा असते याची उत्सुकता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हे सुरु करण्यात येत आहे, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!