मुंबई:- शुक्रवारी भाजपकडून वीजबिल वाढीबाबत राज्यभरात आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या कार्यालयांना टाळेठोको आंदोलन कार्यकर्त्यांनी केले.भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात वीज कंपन्यांविरोधात राहता येथे आंदोलन करण्यात आले, यावेळी राज्य सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये फक्त पदांसाठी संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय ते समजत नाही, अशी टीका विखे यांनी महाविकास आघाडी सकारवर केली होती.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘विखे पाटील जी, सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय. काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच,’ असा टोला अनिल देशमुखांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे.
.@RVikhePatil जी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच! pic.twitter.com/0EDIfYstrM
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 6, 2021
शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धित ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करणार होते. तत्पूर्वी राज्यातील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या संवादानंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतले, यावेळी माध्यमांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील उभे राहिल्याचं पत्रकार परिषदेत दिसून आलं, मंत्री आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना बसण्यासही खुर्ची नसल्याचं पाहून गृहमंत्री अनिल देखमुखांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना


