टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील राज्यातील राजकारणात सध्या आउटगोइंग सुरु आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
विखे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काहीजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातल्या काहींना युतीत प्रवेश करायचा आहे. पण याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील अस विधान केले होते. त्याला अजित पवार यांनी ‘भाजपच्या वाटेवर कशाला? जे आमदार जाणार आहेत, त्यांची नावंच विखे पाटलांनी जाहीर करावीत. उद्या कुणीही काहीही म्हणेल. जे जायचे असतील, ते जातील’अशा शब्दात उत्तर दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्यानंतर त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

