Share

विजयसिंह मोहिते-पाटलांना राज्यपालपद दिलं जाणार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकंच नाही तर अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ४ बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली. मुख्यमंत्री आणि नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर या नेत्यांनी कॅबिनेटच्या विस्ताराआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सहा जणांचा शपथविधी होणार असल्याची चर्चाही आहे.

दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजित सिंह मोहिते पाटील या दोघांपैकी एकालाच पद मिळणार आहे. कुटुंबात एकाच व्यक्तीला पद द्यायचं, हे भाजपचं धोरण आहे. त्यामुळे आता विजयसिंह मोहितेंना राज्यपालपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!