Share

अनिलभैय्या गेले अन् राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला !

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राठोड यांना आठ दिवसापूर्वी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते.

न्युमोनियातून ते बरे होत होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना बरे वाटत होते, आणि त्यांनी हलका आहारही घ्यायला सुरुवात केली होती.मात्र बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

दीर्घकाळ त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते.शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची माहिती कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अनिल राठोड यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगी व मुलगा विक्रम राठोड असा परिवार आहे.

अनिलभैय्या यांच्या रूपाने एक चांगला मित्र गमावला – बाळासाहेब थोरात

अहमदनगर जिल्ह्यातील अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांना अश्रू अनावर झाले. अनिल राठोड यांना अंतिम निरोप देण्यासाठी विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते.

राठोड यांच्याबद्दल आदरांजली व्यक्त करताना आमदार निलेश लंके म्हणाले की,’ आज मी आमदार म्हणून जरी बोलत असलो तरी ते फक्त भैयांचे आशिर्वाद आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होतो तरी मला भैयांचे आशिर्वाद होते. त्यांच्यासारखी दुसरी शक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. नगरमधील सर्वांच्या, सर्व पक्षियांच्यावतीने त्यांना आदरांजली अर्पण करतो,’ अशी भावना लंके यांनी व्यक्त केली.

आमदार निलेश लंके हेसुद्धा पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणूक 2019 च्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या निवडणुकीत लंके यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि लंके आमदार म्हणून निवडूणही आले. त्यामुळे लंके यांचे शिवसेनेमध्ये आजही अनेकांशी भावनिक नाते असल्याचे सांगितले जाते.

कौतुकास्पद : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!