Share

‘एनसीबीच्या अधिकार्‍याने आर्यन खान याचे कधी काऊ़सिलिंग केले त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यातही मंत्री नवाब मलिक हे एनसीबीच्या कारवायांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुख्यतः मलिक यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. यातच आता मलिक यांनी दिलेल्या नव्या आव्हानामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्‍या एनसीबीच्या अधिकार्‍याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला.

एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का ? अशी विचारणा करतानाच देशातील मोठे वकील हरीश साळवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत असाही थेट आरोप नवाब मलिक यांनी केला. दरम्यान, भाजपकडून सातत्याने नवाब मलिक यांचे जावई अडचणीत आले असल्यानेच ते तपास यंत्रणांवर आगपाखड करत असून बेछूट आरोप करत असल्याची टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!