Share

शरद पवार चालतं बोलतं विद्यापीठ – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतू मुंबईला येत असताना त्यांच्या शेजारी परभणीतला एक तरुण प्रवास करत होता. पवार आपल्या शेजारी आहेत या कल्पनेनच तो तरुण हरखून गेला आणि पवारांनीही अगदी सहजपणे त्याला विमानातून जमिनीचा इतिहास सांगितला. तो VIDEO आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. यावेळी ते म्हणाले, “विमानात तरुणाशी संवाद साधणारा शरद पवार यांचा व्हिडीओ पाहिला. यात शरद पवार चालतं बोलतं विद्यापीठच! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हातानं जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे!”

वाचा काय आहे प्रकरण

दिल्ली ते पुणे विमान प्रवासादरम्यान शेजारच्या सीटवर बसलेल्या तरुणाशी बोलतानाचा व्हिडीओ सोशली मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात शरद पवार या तरुणाला काही माहिती देताना दिसत आहेत. तो VIDEO आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पवारांच्या या संवादानंतर त्या तरुणाला असलेलं टेंशन थोडं कमी झालं आणि तोही साहेबांशी संवाद साधू लागाला. विमान जसं पुण्याच्या जवळ येत होतं तसं पवार त्याला जमिनीवर काय आहे. तो भाग कुठला आहे हे सगळं सजावून सांगत आहेत असं दिसतंय. तसेच तरुणाकडून मगरपट्ट्याचा उल्लेख होताच, तेथील शेतकरीच तेथील उद्योगांचा मालक असल्याचं शरद पवार तरुणाला सांगतात. तसेच या ठिकाणच्या तरुणांना सोबत घेऊन कसं काम केलं याचीही माहिती शरद पवार देतात.

या तरुणाचं नाव सारंग जाधव असं आहे. परभणीतील गंगाखेडमधील महिराळ येथे तो राहतो. पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असून, शिक्षकाच्या नोकरीसह शेती करण्याची त्याची इच्छा आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासोबत हा तरूण दिल्लीला गेला होता. परतीच्या प्रवासावेळी शुक्रवारी दिल्ली विमानतळावर खासदार जाधव आणि शरद पवार यांची भेट झाली. दोघेही व्हीआयपी कक्षात बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!