मुंबई : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन यांनी चित्रपट सृष्टीतील १९ व्या शतकातील काळ प्रचंड गाजवला आहे. यांच्या अभिनयाच्या आणि सुंदरतेच्या नेहमीच चर्चा असायाची. वास्तविक जीवनातही या तिघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या आपला वेळ एकत्र घालवतात. यावेळी देखील अंदमान येथे वहिदा, आशा आणि हेलन सुटीचा एकत्र आनंद घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या तिघींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले त्यानंतर हे फोटो आता व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/COrYFVCnxsn/?utm_source=ig_web_copy_link
चित्रपट निर्माता तनुज गर्गने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अंदमानमधील यांचे फोटो शेअर केले आहेत.हे फोटो शेअर करत तनुज गर्ग यांनी लिहिले आहे, ‘पहिला फोटो.. जर दिल चाहता है दिग्गज लोकांवर चित्रीत झाला तर त्यात वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन असतील हे नक्की. या तिघीजणी आपले निवृत्तीनंतरचं आयुष्य छान पद्धतीने एन्जॉय करत आहेत. या तिघीजणी अंदमान येथे त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांनाच त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटेल.’
या फोटोमध्ये वहिदा, आशा आणि हेलन एका बोटमध्ये राइडचा आनंद लुटताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत वहिदा ड्राइव्हर सीटवर बसलेली दिसत आहे. त्यांचे फोटो पाहून सोशल मिडियावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहे. तर अनेकांनी त्यांच्या या वयात देखील असलेला जोश पाहून कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- ‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर
- खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटलांची मागणी


