🕒 1 min read
मुंबई : आज(२८ नोव्हें.)दुपारी १२ वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक असून या बैठकीकरिता शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत(Rakesh Tikait) मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज टिकैत या बैठकीला संबोधित करणार आहेत. तसेच यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना ‘जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’, इशाराही यावेळी टिकैत यांनी दिला.
आज दुपारी बारा वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या बैठकीनंतर टिकैत हे आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या आस्थि कलशाचे मुंबईमध्ये विसर्जन करणार आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासोबतच शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी लागू करावी ही आमची प्रमुख मागणी होती. केंद्राने कृषी कायदे मागे घेतले आहेत, आता एमएसपी देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच जोपर्यंत एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला देखील टिकैत भेट देणार आहेत. तसेच यावेळी ते कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. एसटी कामगारांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावावण्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहणार असल्याची माहिती यावेळी टिकैत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
