पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत. वाटाणा, शेंवग्याचा किलोचा दर 150 रूपये, तर तोंडली, गवारच्या दराने 120 रूपयाचा आकडा गाठला आहे. त्यामुळेच भाज्याच्या दराचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांवर भाज्यांची खरेदी नको रे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.
परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला.
सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला आहे. तरी मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात 10 किलो कांद्याला 450 ते 520 रूपये दर मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीक कांद्याची आवक सुरू होईल. बाजारात आवक वाढल्यास दरातही घट होणार असल्याचेही पोमण यांनी सांगितले.
मागील आठवडाभरापासून पुणे जिल्हा, विभागासह जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी सततच्या पावसाच्या मार्यामुळे गवार, तोंडली, वांगी, भेंडी, शेंवगा, कारली, फ्लॉवर, वाटाणा, कांदा आदी फळभाज्या व कोथिबीर, पालक, मेथी, शेपूर, कांदापात, अंबाडी चवळई आदी पालेभाज्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील घाऊक बाजारातच आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही भाज्यांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच मागील चार दिवंसात काही फळभाच्यांच्या किलोच्या दरात 20 ते 30 रूपये तर काहींच्या दरात 40 ते 50 रूपयांची वाढ झाली आहे. पालेभाज्यांच्या गड्डीच्या दरात 10 ते 15 रूपयांनी वाढ झाली आहे.
पावसामुळे भाज्यांच्या गाड्या वेळेत बाजारात पोहचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. सद्य:स्थितीत एकीकडे थांबून-थांबून कोसळणार्या पावसामुळे शेतातील फळभाज्या व पालेभाज्यांची काडणी करणे शेतकर्यांना अशक्य होत आहे. तर दुसरीकडे पावसाच्या मार्याने भाज्या खराब होत आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्या उपलब्ध होत नसल्याने भाज्यांच्या दर कडाडले आहेत. आवक न वाढल्यास आणखी काही दिवस भाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याचा अंदाज भाज्यांचे किरकोळ विक्रेते अशोक मामा गावडे यांनी व्यक्त केला.
भाज्यांचे घाऊक व्यापारी निखील भुजबळ म्हणाले, पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळेच घाऊक बाजारातही भाज्यांचे दर वाढले आहेत. जो माल येतोय तो भिजलेला आहे. त्यामुळे त्यास मागणी कमी आहे. एक दिवस पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी चांगल्या प्रतीच्या भाज्यांची आवक झाली. उठावही चांगला होता. दरही चांगला मिळाला.
किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर भाज्या किलोचा दर
शेंवगा 150
वाटाणा 150
तोंडली 120
गवार 120
भेंडी 100
वांगी 80
कारली 80
पालेभाज्यांचे गड्डीचे दर
पालेभाज्या गड्डीचा दर
कोथिबीर 60
मुळा 40
मेथी 40
शेपू 40
पालक 30
कांदापात 30
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1193440941601771525?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1193440596444110849?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

