Share

मुंबई पोलिसांची सेक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता – वरुण सरदेसाई

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतु नाही”, अशा शब्दात त्यांनी आपले मत मांडले. त्याचसोबत भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटला युवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची सेक्युरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सेक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर’ ! अस ट्विट करत वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांनी पाटणा शहर एसपी विनय तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची टीम मुंबईला पाठवली आहे. सुशांतच्या बॅंक खात्यातून 15 कोटी रुपयांची रक्कम परस्पर वळती केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने रियावर केला आहे.

निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही – अमृता फडणवीस

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे.

कोरोनाचा धोका वाढला : ‘या’ कॅबिनेट मंत्र्यालाही झाली कोरोनाची लागण 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!