टीम महाराष्ट्र देशा – सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नाही, तर अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याची टीका निरंजन डावखरे यांनी केली होती . कोरोनाविरोधातील लढाई देवेंद्र फडणवीस यांनी अधिक सक्षमपणे हाताळली असती, असं त्यांनी म्हटलं.
सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे.#MaharashtraNeedsDevendra
— Niranjan Davkhare (@niranjandtweets) March 19, 2020
कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शासकीय यंत्रणा सातत्याने काम करत आहेत. मात्र शासनाला सर्व राजकीय पक्षांनी अशा परिस्थितीत सहकार्य करण्याऐवजी राजकारण केलं जात असल्याचा प्रकार समोर येतोय.
आता युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा एवढाच जर देवेंद्र फडणवीसांना अनुभव असेल तर त्यांना वुहानला पाठवा, अशी घणाघाती टीका युवासेना नेते वरूण सरदेसाई यांनी केली आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला वरूण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अशा राजकारण्यांचे पहिलं क्वारंनटाईन केलं पाहिजे. शहाणपण नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग? असं म्हणत तुमच्या नेत्याला एवढाच जर अनुभव असेल तर त्यांना चीन किंवा इटलीला घेऊन जा, असा सल्ला सरदेसाई यांनी भाजपला दिला आहे.
तसेही जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
ह्या असल्या राजकारण्यांना पहिले quarantine केले पाहिजे. काय उपयोग शिक्षणाचा जर शहाणपण नसेल?
एवढाच अनुभव आहे आपत्ती व्यवस्थापनात तर घेऊन जा तुमच्या नेत्यांना Wuhan, Spain किंवा Italy मध्ये.तसेही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे तुमचा. https://t.co/fzhsNYyOt2
— Varun Sardesai (@SardesaiVarun) March 19, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

