Share

दिवाळीत ‘डाएट प्लॅन’ बिघडू नये म्हणून वरूण धवन करतोय कसरत…!

Published On: 

मुंबई : दिवाळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. आता दिवाळीचे गोड पदार्थ खायला मिळावे यासाठी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन जास्त वर्कआऊट करत आहे. त्याचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

वरुण त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. म्हणूनच आता तो दिवाळीसाठी बनवलेले गोड पदार्थ खाल्ल्याने त्याचा डाएट प्लॅन बिघडू नये आणि त्याचा त्याच्या फिटनेसवर परिणाम होऊ नये, म्हणून तो हार्ड वर्कआऊट करत आहे. नुकताच आता त्याचा एक व्हिडिओ फिल्मफेअरने शेअर केला आहे, ज्यात तो त्याचे सिक्सपॅक दाखवताना दिसत आहे.

या व्हिडिओवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आता दिवाळीत भरपूर मिठाई खाण्यासाठी आधीच घाम गाळत आहे, जेणेकरून वरुण धवन मनसोक्त गोडधोड खाऊ शकेल.’वरुणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे ट्रोलिंगलाही सामोरे ही जावे लागत आहे. वरुण धवन शेवटचा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसला होता. आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!