🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – ”हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे… पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला… तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच…पण… पुढच्या वेळी आम्ही जास्त कठोर होऊ…” अशा शब्दांमध्ये मुंबई पोलिसांनी वरूण धवनला डोस दिल्या नंतर वरुण धवने पोलिसांची माफी मागितली आहे.
मी माफी मागतो, पण मी सिग्नल थांबलो होतो त्यावेळी मी तो फोटो काढला आहे. मला माझ्या चाहत्याला दुखवायचे नव्हते त्यामुळे मी तो फोटो काढला. पुढच्या वेळेस अशा प्रकारची चूक होणार नाही याबरोबरच मी सुरक्षितेची संपूर्ण काळजी घेईल. मला कोणत्याही अनुसूचित गोष्टीना प्रोत्साहन द्यायचे नव्हते.
My apologies ???? Our cars weren’t moving since we were at a traffic signal and I didn’t want to hurt the sentiment of a fan but next time I’ll keep safety in mind and won’t encourage this. https://t.co/MEJk56EksG
— VarunDhawan (@Varun_dvn) November 23, 2017
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
