Share

महाराष्ट्र बंद : मोदी आणि शहा यांचे घाणेरडे खेळ जनतेला आवडत नाही – सुजात आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरित्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं.

यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरित्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज च्या बंद’ महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बरेच शहर, गावं बंद आहेत. बर्याच लोकांचा रस्त्यावर नाही पण घरात बसून किंवा दुकान बंद करून एक शांत प्रतिसाद दिसत आहे,’ असे ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘बंदला मिळत असलेल्या हा शांत प्रतिसादाचा अर्थ आम्ही असा काढतो की बरीच जनता CAA च्या विरोधात आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हे घाणरडे खेळ जनतेला आवडत नाहीये,’ अशी टीका सुजात आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली.

दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. आपला लढा थेट RSS शी आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी आहे. या कायद्याच्या विरोधात आहे. म्हणून शांततेत बंद पार पाडावा. आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आपला हा संदेश पोहचावा. आपल्याला हिसाचाराशिवाय हा बंद पार पडायचा आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!