Share

रिक्त पदांची भरती न झाल्याने बदनापूर ग्रामीण रूग्णलायात सेवा मिळण्यास होतीये अडचण

Published On: 

बदनापूर, दि. 30 (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज् असतानाच बदनापूर येथील ग्रामीण रूग्णलायात मात्र सर्वसामान्य रुग्णांना सेवा मिळण्यास प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. या ग्रामीण रूग्णालयात बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे व शहरापासून हे रूग्णालय अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे रूग्णांना येथे येण्यास अडचणी येत असतानाच सुविधाचाही वाणवाच आहे. तसेच अपुऱ्या कर्मचारी बळावर रूग्णसेवा कोलमडण्याची परिस्थिती आहे.

बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक पद सध्या रिक्त असल्याने अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम ढाकणे यांच्याकडे आहे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तीन पदे आहेत त्यातील पद रिक्त आहे. तसेच कार्यालयीन कामासाठीची पदेही रिक्त आहेत.

कनिष्ठ लिपिकाच्या २ पदापैकी १ पद रिक्त, शिपाईचे ७ पदांपैकी ३ पदे रिक्त. सुरक्षारक्षाकचे ३ पदांपैकी १ पद रिक्त आहे, अशा अपुरऱ्या कर्मचाऱ्यांच्या बळावर हे रूग्णालय सुरू असून उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर याचा प्रचंड ताण येत आहे. त्यातल्यात्यात काही कर्मचारी मुख्यालयात रहात नसलयाचेही निदर्शनास येत आहे.

राज्यात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालिन सेवा देणाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही हे कर्मचारी रहात नाही त्यामुळे नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी अडचण होत आहे. तसेच हे रुग्णालय शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यास वाहने मिळत नसल्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या कोरोना आजारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरणनिर्माण झालेले असल्याकारणाने व लॉकडाऊन परिस्थितीत ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतरही रूग्ण कसाबसा रुग्णालयात आला तर १० वाजेपर्यंत रूग्णसेवा सुरूच होत नाही. वैद्यकीय अधिकारी बरोबर नऊ वाजता येऊन रूग्ण तपासणीसाठी सज्ज असतात परंतु नियमानुसार आधी चिठठी अर्थात केस पेपर काढणे आवश्यक असते. ही चिठठी देणारा कर्मचारी मात्र १० वाजेपर्यंत नसतेा. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असूनही ईलाज मात्र होत नाही.

यानंतर कसे बसे रूग्ण तपासले गेले तर त्यानंतर औषधी देणारा कर्मचारीही वेळेवर जागेवर सापडत नाही. काही वेळेस तर चक्क शिपाई किंवा सुरक्षारक्षकांना औषधी काढून द्यावे लागत असल्याचे प्रकार येथे दिसून येतात. या ठिकाणी सद्य स्थितीत ६ पदे रिक्त असल्यामूळे आपत्कालीन स्थितीत रूग्णसेवा ढेपाळण्याच्या परिस्थितीत आहे.

सद्यस्थितीत ग्रामीण रूग्णालयात कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमीवर ५ खाटा अईसोलेशनसाठी राखीव केलेल्या असून या रोगाच्या पार्श्वभूमीवर बाहय रूग्ण विभागातही सोशल डिस्टेन्शंन ठेऊन रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. पालकमंत्री व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित या ग्रामीण रूग्णालयाच्या कारभाराकडे लक्ष देऊन येथील रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुधारावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!