🕒 1 min read
मुंबई : वाढीव वीज बिल विरोधात भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाच भडका पाहायला मिळाला. ठीक ठिकाणी भाजपकार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी केली होती.
यावरच भाजपने चार ट्वीट करत महाविकासआघाडीवर निशाणा साधला होता. कर्जमाफीच्या आणि वीजबिल सवलतीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात जनतेसह बळीराजालाही लुबाडणाऱ्यांचं हे सरकार आहे. आता सर्वांनी एकजूट होऊन यांनाच दणका देऊया ! वीज वापरली तर आता बिलं भरा असं म्हणणाऱ्या असंवेदनशील महाभकास आघाडी सरकारचा धिक्कार असो ! असे चार फोटो भाजपने ट्वीट केले होते.
राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी कर्तव्यातून आपले हात झटकत पळ काढणाऱ्या या सरकारला कायमचं पळवून लावूया. वाढीव वीजबिलासंदर्भात सवलत देऊ, अशी वारंवार घोषणा करुन युटर्न घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असे ट्विट भाजपने केले होते.
यावरच आता भाजप नेते अतुल भातकळकर यांनी ट्विट केले आहे. ट्विट मध्ये म्हणले कि, ‘नावातच UT आहे… U Turn बाबत आश्चर्य का वाटावे?’ असा टोला भाजप नेते अतुल भातकळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
नावातच UT आहे…
U Turn बाबत आश्चर्य
का वाटावे? pic.twitter.com/2qw8tuT5Io— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीची कारवाई ही ऑपरेशन कमळची सुरुवात’
- पंतप्रधान मोदी पुण्यात येणार मात्र ‘छोटे भाई’ उद्धव ठाकरे राहणार अनुपस्थित !
- प्रताप सरनाईक यांच्या ईडी कारवाईवर, सचिन सावंत यांचा फडणवीसांना थेट सवाल
- ‘मागून हल्ला केला, पुढून आले असते तर माझ्या यशने ३ जण तरी मारले असते’
- ईडीचा धडाका सुरूच : विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची १० तास चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

