मुंबई: “पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकी भाजप-शिवसेना एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप भर सभेत सादर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राजकीय वातावरण आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही तेल ओतले आहे. इंधन दरवाढीवरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
In Mumbai, fuel prices are at highest ever as per cities, in Maharashtra as per States. I hope Govt uses “Saam, Daam, Dand Bhed” to control “Fuel ke Daam” rather than to tackle elections. In 2014 that was the promise from a party. Today we get excuses tweeted than the promise!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

