लातूर : राज्यामध्ये सन 2019 मध्ये उशीरा पडलेला पाऊस व सोयाबिन पिकाच्या काढणीच्या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे सोयाबिन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परीणाम झालेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिजोत्पादन क्षेत्रावर उत्पादन झालेले बियाणे व शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये प्रमाणित बियाणे पेरणी करुन उत्पादित केलेले बियाणे हे येणाऱ्या खरीप हंगामामध्ये व्यवस्थित राखून ठेवणे गरजेचे आहे.
सोयाबिन हे स्वपरागसिंचीत पिक असल्याने पेरण्यात बियाणे सरळ वाणाचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. मागील हंगामात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे बियाणे शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्चात बचत होऊ शकते.
प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेल्या बियाण्याची चाळणी करुन निवड करावी. सोयाबिन बियाणे उन्हामध्ये वाळवुन त्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के पर्यंत आणावे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध् असलेले वाण निहाय सोयाबिन बियाण्याची माहिती संबंधित कृषि सहाय्यकाकडे दयावी.जेणेकरुन सोयाबिन पिकाच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या 70 टक्के बियाण्याची गरज त्याच गावातील शेतकऱ्यांच्या स्वत:च्या उत्पादित केलेल्या बियाण्यातून भागविणे शक्य होईल.
खरीप 2020 मध्ये सोयाबिनचे बियाणे उपलब्ध् होण्याच्या दृष्टीने चांगल्या उगवण शक्तिच्या घरच्या बियाण्याला बुरशीनाशकाची बिज प्रक्रिया करुन पेरणीसाठी वापरल्यास उगवण शक्ती चांगली होऊन उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

