Share

Russia-Ukraine War: रशिया -भारत संबंधांबाबतीत अमेरिकेचे मोठे विधान 

Published On: 

नवी दिल्ली : सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO संघटनेमध्ये सहभागी होऊ नये ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची प्रमुख मागणी आहे. रशियाच्या सैनिकी ताकदीसमोर युक्रेनचा टिकाव लागणे हे अत्यंत कठीण आहे. मात्र युक्रेनला भूमीवर प्रत्यक्ष मदत करायला जगातील कोणतेच राष्ट्र धजावत नाहीये. आमच्या दोन देशांच्या भांडणात कोणताही तिसरा देश मधे पडला तर  संपूर्ण जगालाच गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा तीव्र इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे.

कालच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा पारिषदेत रशिया विरुद्ध मतदानाची वेळ आली असताना भारत अनुपस्थित राहिला. भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये फार जुन्या काळापासून चांगले संबंध आहेत. गेल्या काही दशकात अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये पण संबंध सुधारत आहेत. अमेरिका आणि भारत या दोन देशांमधील संबंध सुधारत असले तरी ; भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये वेगळ्याच पातळीचे संबंध आहेत असे आज अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. भारत-रशिया संबंध, हे अमेरिका आणि रशियाच्या संबंधांपेक्षा फार वेगळे आहेत आणि यात काहीही अडचण नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन प्रशासनाने म्हटले आहे.

भारत आणि रशिया या दोन देशांमधील  संबंधांबद्दल बोलताना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले कि, ” भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये हितसंबंध आणि मूल्ये जोडली गेलेली आहेत. आमच्यात लष्करी, तांत्रिक आणि आर्थिक अश्या अनेक स्वरूपाचे व्यवहार चालत असतात. मात्र रशिया आणि भारत या दोन देशांमध्ये असलेले संबंध आम्हाला मान्य आहेत. भारताने रशिया बरोबर संबंध ठेवले आहेत यात गैर काहीच नाहीये असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले. भारत आणि अमेरिका पेक्षा भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये नक्कीच जिव्हाळ्याचे संबंध आहेत व आम्हाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही असेही नेड प्राइस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!