Share

रिलीजआधी ‘पद्मावती’चा धुमाकूळ;अनेक नवीन विक्रम प्रस्थापित

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा ‘पद्मावती’ सिनेमा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता प्रदर्शनाच्या आधीच या सिनेमाने अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘बाहुबली 2’ आणि ‘दंगल’ सारख्या सुपर-डुपर सिनेमांना मागे टाकून हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आहे.

180 कोटी रुपयांचं बजेट असलेला पद्मावती 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतात 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर जगभरात या सिनेमाच्या वितरणाची जबाबदारी हॉलिवूडचं फेमस स्टुडिओ पॅरामाऊंट पिक्चर्सकडे देण्यात आली आहे.

निर्मात्यांनी हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक विक्रमच आहे. एवढ्या देशांमध्ये प्रदर्शित होणारा पद्मावती हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. असं झाल्यास हा चित्रपट बाहुबली 2 आणि दंगलपेक्षाही जास्त कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा अमेरिका, यूके, फिजी, सिंगापूर, मलेशिया आणि आखाती देशात मोठ्या प्रमाणावर रिलीज केला जाणार आहे. तर चीनमध्येही चित्रपट रिलीज करण्याचा विचार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!