Share

आशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

अनुभवी गोलंदाज आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे.फिरोज शाह कोटला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-20 सामन्यानंतर तो निवृत्ती जाहीर करणार आहे.

आयसीसी 2018 मध्ये टी-20 विश्वचषकाचं आयोजन करणार नाही. त्यामुळे चांगली कामगिरी करत असलेल्या युवा खेळाडूंना संधी देणं जास्त योग्य राहिल, असं नेहराने म्हटलं आहे.आयपीएलच्या पुढच्या मोसमातही नेहरा खेळणार नसल्याची माहिती आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे.

नेहरा १७ टेस्ट, १२० वनडे आणि २६ टी 20 मॅच खेळला आहे. नेहरानं ४४ टेस्ट विकेट, १५७ वनडे विकेट आणि ३४ टी 20 विकेट घेतल्या आहेत. २००३ वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध नेहरानं केलेली भेदक बॉलिंग क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहील. २०११ साली भारतानं जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप टीममध्येही नेहराचा समावेश होता.इतक्या वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे. १९९९ साली मोहम्मद अजहरुद्दीन कॅप्टन असताना नेहरा पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.आशिष नेहरा सध्याचा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीबरोबर खेळला आहे. याचबरोबर तो धोनी, द्रविड, गंभीर, गांगुली, सेहवाग आणि अजहरच्या कर्णधारपदाखालीही नेहरा खेळला आहे.

आशिष नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मॅच सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली खेळल्या आहेत. गांगुली कर्णधार असताना नेहरा ७७ टेस्ट आणि वनडे मॅच खेळला, यामध्ये त्याला ११५ विकेट मिळाल्या. यामध्ये २००३च्या वर्ल्ड कपमधली इंग्लंडविरुद्धची मॅचही समाविष्ट आहे. या मॅचमध्ये नेहरानं २३ रन्स देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. गांगुलीनंतर नेहरा धोनीच्या कर्णधारपदाखाली सर्वात जास्त खेळला. धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळताना नेहरानं ६४ मॅच खेळून ८७ विकेट घेतल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!