Share

मोदी सरकारच शेतकऱ्यांसाठी गिफ्ट, उद्या होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शेतकरी वर्ग हा नाराज होता. त्यामुळे मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच शेतकऱ्याला कर्ज सहज उपलब्ध व्हावे या दृष्टीने योजना राबवण्यात येणार आहेत. शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत.

या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या कार्डवर तीन लाखांपर्यंत कर्ज मिळत आहे. तसंच सरकार या कार्डवर 1 लाख रुपये एवढं बिनव्याजी कर्ज देण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार एवढी रक्कम देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. या रक्कमेत वाढ होऊन हा निधी 8 हजारांपर्यंत दिला जाऊ शकतो.

दरम्यान मोदी सरकारने आता दुसऱ्या टर्ममध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश असेलेली ही समिती 2 महिन्यात आपला रिपोर्ट देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयोजक असणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!