टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुड एक्टर आमिर खानची एक मोठी बातमी समोर आली आहे. आमिर खानने मुंबईमध्ये तब्बल ३५ करोडची प्रोपर्टी खरेदी केली आहे. आमिरने मुंबईमध्ये सांताक्रूज परिसरात एसवी जवळ ३५ करोड किमतीची प्रोपर्टी खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिरने ही प्रोपर्टी प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेडच्या नावाने खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी अमीर खानने २.१ कोटी रुपये स्टँप ड्यूटीची भरपाई केली आहे. त्याने एसव्ही रोड स्थित प्राइम प्लाजा मध्ये ही विशाल प्रॉपर्टी आपल्या नावे केली आहे.
आमिर खान ने प्राइम प्लाजा मध्ये दुसरा आणि तिसरा मजला कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आमिर खान या विशाल प्रॉपर्टीमध्ये प्रोडक्शन हाउस सुरु करणार आहे. त्याचबरोबर आमिरने त्याच्या व्यवसायाच्या आणि पर्यायांचा शोध घेण्याकरिता ही प्रॉपर्टी खरेदी खरेदी केली आहे. वृत्तानुसार, गेल्या बऱ्याच काळापासून आमिर खान आपल्या व्यवसायासाठी जागा शोधत होता.
आमिर खान लवकरच ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. आमिरने या चित्रपटाची तयारीदेखील सुरु केली आहे. या चित्रपटात आमिर लाल सिंह चढ्ढा या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिरने या चित्रपटासाठी अधिक मेहनत घेतल्याअसल्याचे समजत आहे आमिरने या चित्रपटासाठी वजन कमी केले आहे.
‘लाल सिंह चढ्ढा’ लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकणार का? आमिरच्या हा चित्रपट कधी रिलीज होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लावले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

