🕒 1 min read
नागपूर : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याची टीका भाजप नेते करत आहेत. येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला मोठा धक्का बसणार असून याला आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत आज भाजपने १ हजार ठिकाणी आक्रमक निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.
संपूर्ण राज्यभरात भाजपच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातील आंदोलनात सहभाग घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. नागपुरातील मानेवाडा चौकात आंदोलन करत बावनकुळे यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या दिला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. दरम्यान, कोणतीही पूर्वसूचना आणि परवानगी न घेता केलेल्या या आंदोलनामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नागपूर, जळगाव आणि कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजपकडून आक्रमक आंदोलन करण्यात येत असून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. पाच जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कमी पडले, वेळीच इम्पिरिकल डेटा गोळा केला नाही त्यामुळेच न्यायालयाने केवळ महाराष्ट्रातीलच अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! मराठा आरक्षणाअभावी नोकरी मिळेना, जालन्यातील हतबल युवकाने संपवले जीवन
- ‘आयपीएलसाठी कसोटी क्रिकेटचा अपमान केला’; माजी इंग्लिश क्रिकेटपटूने सुनावले खडेबोल
- पोटनिवडणुका जाहीर; ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चेत तोडगा काढणार-विजय वडेट्टीवार
- मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीमध्ये बसून निर्णय घेतात आणि जनतेवर निर्बंध घालतात – पाटील
- ‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’


