जालना : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक मराठा युवक निराश झाले आहेत. अशातच परतूर (जि.जालना) आष्टी येथील येणोरा गावातील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शिवाय मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नव्हती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या हतबल युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदाशिव शिवाजी भुंबर असे मृत तरुणाचे नाव आबे. तो २२ वर्षांचा होता. त्याने इलेक्ट्रिशनचा कोर्सही केला होता. पण मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे नुकतेच तो गावी परतला होता.
गावी शेती करत असताना पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. नोकरी नाही, वरून आर्थिक संकट कोसळल्याने तो हवालदिल झाला. यामुळे सदाशिवने आपल्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने टोकाचे पाऊल का उचलावे लागले याचा खुलासा केला आहे. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात स्फोट घडवण्याचा तयारीत असलेल्या सहा दहशतवाद्यांना अटक
- ‘तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत बरेच साम्य’; जावेद अख्तर यांचं मोठं भाष्य
- पोटनिवडणुका जाहीर; ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चेत तोडगा काढणार-विजय वडेट्टीवार
- मुख्यमंत्री मंत्रालयात न जाता मातोश्रीमध्ये बसून निर्णय घेतात आणि जनतेवर निर्बंध घालतात – पाटील
- ‘किरीट सोमय्या बिल्डरांसाठी काम करतात, त्यातून त्यांच्या संस्थेला निधी मिळतो’

