Share

मरेपर्यंत मी धनंजय मुंडेंच्या विरोधात लढणार- रेणू शर्मा

Published On: 

मुंबई:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्यावर खंडणी वसूल करण्यासाठीच माझ्यावर बलात्काराचा आरोप करून मला ब्लॅकमेल केलं जात असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यावर रेणू शर्मा यांनी ब्लॅकमेलच्या मुद्द्याशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? असं सांगत आपण शेवटरपर्यंत लढणार असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी लेखी तक्रार नोंदवून न घेतल्याबद्दलही रेणूने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पोलीस असो की इतर राज्यांचे पोलीस, मी सर्वांचा आदर करते. पण काही लोक त्यांच्या पदाचा फायदा उठवून पोलिसांना काम करू देत नाही, असंही रेणूने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!