Share

ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा : चंद्रकांत खैरे

Published On: 

बीड  : ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात बीड जिल्हा शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक केज आणि बीड येथे पार पडली यावेळी ते बोलत होते.

ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवा, निधी आम्ही देऊ, असे आश्वासन रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, अनिल जगताप, युद्धजीत पंडित, संगीता चव्हाण, परमेश्वर सातपुते, गिरीश देशपांडे, रत्नमाला मुंडे, चंद्रकला बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवून गावातील विकासकामे करण्यासाठी कामाला लागावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्राची विकासाची गंगा गावागावांत पोहोचावी. भुमरे यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना व संपर्क मंत्री या जबाबदारीने माझ्याकडील खात्यातील सर्व योजना प्रत्येक गावात पोहोचवण्याकरिता शिवसैनिकांनी कटिबद्ध राहावे व आम्ही मंत्री म्हणून वचनबद्ध राहू, असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!