Share

#corona : राज्य आणि रेल्वेची जुंपली, CM ठाकरेंच्या आरोपावर गोयलांचे रात्री 2 वाजेपर्यंत ट्विट…

Published On: 

मुंबई : श्रमिकांना घरी पोहचवण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला केवळ 50% रेल्वे गाड्या देत आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केला. यावरून आता रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली असल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्रात खासकरून मुंबईमध्ये परप्रांतीय मजुरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीदेखील रेल्वे प्रशासन केवळ 50 % गाड्या देत आहे, असे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले होते. यावर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी लगेच ट्विट करत आम्ही 125 गाड्या पाठवण्यास तयार आहोत. तुम्ही केवळ श्रमिकांची संख्या आणि किती गाड्या हव्या आहेत याची माहिती द्यावी.

रेल्वेमंत्र्यांनी याबाबत 3 ट्विट केले त्यानंतर रात्री 12 वाजता पीयूष गोयल यांनी पुन्हा ट्विट करुन रात्रीचे बारा वाजले आहेत आणि 5 तासांनंतरही आमच्याकडे महाराष्ट्र सरकारकडून उद्याच्या 125 ट्रेनची माहिती आणि प्रवाशांची यादी आली नाही. तरीही मी अधिकाऱ्यांना प्रतिक्षा करा आणि तयारी सुरु ठेवा असा आदेश दिल्याचं त्यांनी सांगितले.

मात्र रात्री 2 वाजता पियुष गोयल यांनी पुन्हा ट्विट करत महाराष्ट्र राज्य सरकारकडून 46 गाड्यांची यादी पाठवली असल्याची माहिती दिली. तर 41 ट्रेन सोडाव्या लागतील कारण उर्वरित ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओडिसा याठिकाणच्या आहेत. तिथे अम्फान चक्रीवादळामुळे ट्रेन चालवण्यास परवानगी नसल्याचं पियूष गोयल यांनी सांगितले.

दरम्यान राज्य आणि रेल्वेमध्ये सुरु असलेल्या वादात शिवसेना खा. संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास आवश्यक असणाऱ्या गाड्यांची यादी सादर केली आहे. फक्त केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच ठिकाणी पोहचू द्या, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहचू नये, अशा शेलक्या शब्दात टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

#Corona : परीक्षेसाठी एवढी लुडबूड का ? शिवसेनेने घेतला राज्यपालांचा समाचार

#corona : राज्यात कोरोनाबाधितांनी गाठला 50 हजाराचा आकडा ! 3041 रुग्णांची नव्याने भर 

चीनने दिले प्रत्युत्तर ! अमेरिका जाणूनबुजून चीनला बदनाम करतीये : परराष्ट्र मंत्र्यांनी दिला इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!