Share

शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ – कृषीमंत्री

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात बळीराजा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे मात्र सत्तेची नशा चढलेल्या मंत्र्यांना याचीची काहीही पडलेली नसल्याच दिसत आहे. बळीराजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्याच काम केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल आहे.

शेतकऱ्यांचा संघर्ष ‘नाटकी’ असल्याचं सांगत शेतकरी आंदोलन म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचं बेताल वक्तव्य राधामोहन सिंह यांनी केल आहे. दरम्यान, देशभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवस संपाचं हत्यार उपसलं आहे. या आंदोलनाविषयी पाटणा येथील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले.

त्यावर माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, असं बेजबाबदारपणाचं उत्तर त्यांनी दिलं. देशभरात बारा ते चौदा कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत ५०० ते १००० शेतकरी असतील आणि त्यांना माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काही तरी करावं लागतं, असं ते म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!