टीम महाराष्ट्र देशा : नववर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे.
विदर्भात तीन जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या काही भागात पहाटे सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यानंतर लगेचच गारपीटीला सुरुवात झाली. वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
नागपूरला गारपीटीनी झोडून काढलयं, याच प्रमाणे अवेळी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. गहू, हरभरा, संत्री यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. सध्या कापणीला आलेल्या तूर पिकाची आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकर्यांना भीती निर्माण झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

