लातूर: लातूर शहर व जिल्हा परिसरातील जनतेस या जाहीर प्रगटनाव्दारे सुचित करण्यात येते की, पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर हद्दीमधील नमुद केलेले दुचाकी वहाने त्यांचा प्रकार नोंदणी क्रमांक, इंजिन नंबर व चेसिस नंबर, असे बेवारस स्थितीत मिळाले आहेत त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८२ प्रमाणे कार्यवाही करुन ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्यांच्या ओळखीच्या त्या दुचाकी वाहन असतील त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदरील बेवारस मोटार सायकल/ दुचाकींवर ज्या कोणा व्यक्तीचा मालकी हक्क असेल त्या व्यक्तीने हे जाहीर प्रगटन प्रसिध्द झाल्यापासून दोन महिण्याच्या आत कायदेशीर मालकी संबंधाचे कागदपत्र पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर यांच्याकडे सादर करावेत. तसेच ही वाहने कागदपत्रे नसतील तर ताब्यात देण्यात येणार नाहीयेत, त्यामुळे त्या ज्यांच्या कोणाच्या असतील त्यांनी कागद पत्रे सोबत ठेवावीत.
तसेच हे प्रगटण जाहीर केल्याच्या तारखेपासून पुढील दोन महिन्यांच्या आतच गाडी ताब्यात घेण्यास जावे. तसेच विहीत मुदतीमध्ये कोणाचीही मालकी हक्क सिध्द नाही झाल्यास कोणाचीही काही तक्रार नाही, असे गृहीत धरुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ४५८ प्रमाणे कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी.लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नियमावलीवरून मोदी सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात पहिला गुन्हा युपीत दाखल
- ‘जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक दाखवा’; अमेय खोपकरांचा सरकारवर निशाणा
- ‘माझ्या आजारपणाचा फायदा घेत काकांनी कट रचला’, चिराग पासवान यांचा आरोप
- ‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
- ‘खोटारड्या मोदी सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ; जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?’

