Share

नगर-मनमाड महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; नागरिकांमध्ये असंतोष…

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : नगर शहर असो वा जिल्हा रस्त्यांची दुरावस्था आणि नगर हे एक समीकरणच आहे. सरकार कुणाचही असो जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. यामध्ये पावसाळ्यात विशेषता नागरिकांना या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नगर- मनमाड महामार्गाची देखील अशीच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांचा महामार्ग अशीच जणू या रस्त्याची ओळख झाली आहे. खड्ड्यांमुळे या महामार्गावर अनेक अपघात घडतात. तर या रस्त्यावर वाहने चालवणे म्हणजे जीव धोक्यात घालावा लागतो असं मत नागरिक व्यक्त करत आहेत.

मागील पंचवीस वर्षात या महामार्गाचे काम एका टप्प्यात पूर्ण करण्यात आलेले नसल्याने वारंवार दुर्दशा होत आहे. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी आणि शनिशिंगणापूर ही तीर्थक्षेत्रे नगर जिल्ह्यात असताना देखील रस्त्यांची दुरावस्था आहे. तर अनेकदा आंदोलन करून देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे.

पुणे-अहमदनगर महामार्ग होणार सहापदरी !

तर दुसरीकडे पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापुर हा मार्ग सहा पदरी करण्‍यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.

ठाकरे सरकारमध्ये ‘काँग्रेस’ला कोणी विचारत नाही : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!