Share

‘कितीही संकटे येउदे जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी झोकून देणे हीच शिवसैनिकांची ओळख’

Published On: 

मुंबई : कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याला प्रतिसाद देत परिवहनमंत्री अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज मुंबईतील शिवसेनेच्या विभागांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. एकता मंच तसेच श्री.चैतन्य ओंकार ट्रस्ट यांच्या सहकार्याने १३ रुग्णवाहिकांचे तर जाणीव ट्रस्ट तर्फे १२ रुग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्यासह मुंबईत झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकांची लागणारी गरज ओळखत आज त्या उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोनासारख्या आजारात शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याची शक्यता असते त्यामुळेच या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधेने सुसज्ज असून यात नवीन तंत्रज्ञानच्या स्ट्रेचरचा वापर करण्यात आला आहे.

बुलेट ट्रेन होणार कि नाही? उद्धव ठाकरेंनी घेतली ‘ही’ भूमिका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक करताना सांगितले की शिवसेनेच्या पिढ्यांप्रमाणेच रुग्णवाहिका देखील अद्ययावत झाल्या आहेत. रुग्णवाहिका आणि शिवसेना हे नाते जुने असल्याचे ते म्हणाले. तर, ‘मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की शिवसेना आणि शिवसैनिकांची ओळख ही कितीही संकट येवो, कोणतेही संकट येवो, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या नागरिकांसाठी झोकून देऊन त्यांना मदत करणे ही ती ओळख आहे. अस देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

पाडापाडीचं राजकारण हि त्यांची लोकशाही; भाजपावर ठाकरेंची खोचक टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!