मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली अनलॉक मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रदर्शित करण्यात आला. काल व आज अशा दोन भागात प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे उद्धव ठाकरे यांनी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. भाजपाशी केंद्रासह राज्यातील युती तोडल्यानंतर भाजपाच्या देशभरातील राजकारणावर ठाकरेंनी टीका केली आहे.
संजय राऊत यांनी, भाजपचा सरकार पडण्याचा इरादा नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाचं थेट आव्हानात्मक उत्तर दिल आहे. ते म्हणतात, ‘ इरादा असेल नसेल माहित नाही, पण काही जण ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरकार पडेल असं म्हणतात. मी इथेच बसलोय, माझं सरकार आता पाडा. मी काही फेव्हिकॉल लावून बसलेलो नाही. तर, काही जणांना घडवण्यात आनंद असतो तर काहींना बिघडवण्यात असतो, अशी खोचक टीका देखील त्यांनी भाजपावर केली. तसेच हा माझा स्वभाव असल्याचे देखील सांगितले.
बुलेट ट्रेन होणार कि नाही? उद्धव ठाकरेंनी घेतली ‘ही’ भूमिका
हे सरकार खूप कष्टातून झालंय, हे सरकार टिकलं पाहिजे अशी लोकांची भावना असताना, या सरकारचं भवितव्य हे विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही. मध्य प्रदेश मधील काँग्रेसच सरकार पाडलं, राजस्थानमध्ये देखील हा प्रयत्न झाला, तर आता नंबर महाराष्ट्राचा असं म्हणलं जात आहे. तर, पैश्यांची ताकद लावून सरकार पाडणे हे भाजपाची लोकशाही असून शिवसेनाप्रमुखांना देखील असली दळभद्री लोकशाही मान्य नव्हती असे, ठाकरेंनी सांगितले. हे घृणास्पद असून चौकश्यांचा ससेमिरा लावणे हे चुकीचं आहे. फोडाफोडी म्हणजे वापरा आणि फेकून द्या असेही असल्याचं सांगून लोकप्रतिनिधींनी विचार करावा, असा उपदेश देखील दिला.
तर, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘आम्हाला हे सरकार पाडण्यात अजिबात रस नसून हे उगाचंच हे स्वतःच्या मनाचे सांगत असून हे सरकार स्वतःच पडेल,’ असं देखील ते म्हणाले होते. आमदार नितेश राणे यांनी, ‘ पहिल्यांदा बघितले..मुख्यमंत्री सकट सगळे मंत्री सांगत आहेत..आमच सरकार पाडा!! इतकी घाई कधीच बघितली नाही…’ अशी खोचक टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानासोबतच महाविकासआघाडीवर निशाणा साधला होता.
लाज असेल तर सरकार चालवून दाखवा, ‘या’ भाजपा प्रवक्त्याने दिले चॅलेंज!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

