Share

सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत : उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणारच, एनपीएची अडचण नाही. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त करु. गेल्या दोन महिन्यात पहिली यादी जारी केली. दुसरी यादी पण जारी केली.शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु, 10 लाख शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण झाले आहे, 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरेंकडे सोपवल्यानंतर राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरु असताना आज (ता. ३) त्यांनी पत्रकार परिषद घेत त्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाचे संपादकपद दिले असले तरी संपादकीय ची जबाबदारी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडेच राहील. सामनाची भाषा ही आमची पितृभाषा आहे ती आहे तशीच राहणार, तिची भाषा आणि दिशाही बदलणार नाही.’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, सीएए आणि एनआरसीमुळे राज्यातील एकाही नागरिकाचं नागरिकत्व हिरावू देणार नाही. महाआघाडीच्या नेत्यांची समिती तयार करुन यावर भूमिका ठरवणार आहोत. मराठा आरक्षणावर सरकार न्यायालयात ताकदीने लढत आहे. मुस्लिम आरक्षणावरुन आदळआपट करु नका, मुद्दा समोर आल्यावर भूमिका स्पष्ट करु, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!