🕒 1 min read
मुंबई : रश्मी ठाकरे यांच्याकडे सामनाचे संपादकपद दिले असले तरी संपादकीय ची जबाबदारी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडेच राहील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच सामनाची भाषा ही पितृभाषा आहे ती आहे तशीच राहणार, तिची भाषा आणि दिशाही बदलणार नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केले. येत्या ७ मार्चला अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहे, देव सर्वांचा आहे, देवदर्शनात कोणत राजकारण ? असा सवालही यांनी यावेळी केला. ज्यांना यायचं ते येऊ शकतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे त्यांनी म. जोतीराव फुले कर्जमाफी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली आहे. आता उर्वरित यादी लवकरच येईल, आम्ही घाई गडबडीने काही करणार नाही. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


