टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओ वक्तव्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीयोला, लाव रे फटाके म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडणूक लढला नाही. मात्र तरीही राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी सभा घेतल्या. इतकेच नव्हे तर, लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी भाजपची पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभेचा कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला फायदा होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणूकीच्या आतापर्यंतच्या निकालात झिरो इफेक्ट झाल्याचे दिसून आले.
इतकेच नव्हे तर यंदाच्या निवडणुकीत राज्यात भाजपा २३, शिवसेना १८, कॉंग्रेस १, राष्ट्रावादी ५ तर वंचित १ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आभिनंदन करण्यासाठी मातोश्रीवर पोहोंचले आहेत.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओला, लाव रे फटाके म्हणत टोला लगावला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
