🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी मुंबई येथे पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अश्रुंना मगरीच्या अश्रूंची उपमा दिली. तसेच विविध प्रकारची आश्वासने त्यांनी यावेळी दिली.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याविषयीचे स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. याचाच समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यांनी अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू आहेत की आता राजकारणाचा स्तर खालावला आहे. त्यामुळे मी शेती करणार. शेती करणार मात्र धरणात पाणी नसेल तर काय करणार? अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यातील नागरिकांना दहा रुपयात पूर्ण अन्न उपलब्ध करुन देणार, रोगराई वाढतेय त्यामुळे एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देणार, 300 युनिटचा घरगुती वीज वापराचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181772239508656130?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181579804883079168?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
