Share

‘असा’ असेल उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा,जाणून घ्या कधी उध्दव ठाकरे जाणार आयोध्या दौऱ्यावर ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं वृत्तप्रसिद्ध होताच अयोध्येसह उत्तर भारतात हिंदू समाजात चैतन्य निर्माण झालं आहे. सगळीकडे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचीच चर्चा आहे. या दौऱ्याआधी अयोध्येतील तयारीची पहाणी करण्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज अयोध्येला भेट दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी तेथील पाहणी करण्याकरता दाखल झालेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला देखील भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना ‘राम मंदिराचा मुद्दा न्यायालयाचा विषय नसून तो आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2019 आधी राम मंदिर निर्माणासाठी संसदेत अध्यादेश आणावा. नाही तर जनताच भाजपला वनवासात पाठवेल’, असा खणखणीत इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘मी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित यात्रेच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. राममंदिर निर्माणाच्या दिशेनं आपण आणखी एक पाऊल पुढे कसे जाऊ शकतो त्याच प्रयत्नात इथे आलो आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी भगवान श्री रामचंद्रांचं दर्शन करतील’, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.दरम्यान,उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान अयोध्येत सभा घेणार का? ते काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नगरमध्ये शिवसेनेचा मनसेला जोरदार धक्का

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!