मुंबई : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच रद्द केले होते. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्यायकारक आहे. दाखल केलेल्या विशेषाधिकार याचिकेअंतर्गत उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे निरीक्षण करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.
दरम्यान आता नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राणा यांनी सादर केलेलं जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मिळवून नंतर जात वैधता प्रमाणपत्रही मिळवल्याबद्दल राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप केला होता. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काळा पैसा परदेशात आहे. हॉटेल, घर स्वरूपात त्यांनी विदेशात संपत्ती कमावली आहे. माझ्याकडे ठाकरेंच्या काळ्या संपत्तीचे पुरावे असून लवकरच ईडी आणि सीबीआयकडे हे पुरावे देणार असल्याचे आमदार रवि राणा यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आता नवनीत राणा यांचा जात पडताळणी प्रमाणपत्राचा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील गंभीर आरोपांपर्यंत आला आहे. याला शिवसेना नेते काय उत्तर देतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळांसदर्भात झाली चर्चा ; ‘असे’ होणार वाटप
- ‘वडेट्टीवार, भुजबळ फक्त घोषणा करत राहिले अन् प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले’
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली


