Share

उद्धव ठाकरेंनी भरसभेत सादर केली मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ऑडिओ क्लीप

Published On: 

पालघर – भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

दरम्यान शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या क्लीपमध्ये देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना पालघरची निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्याची सूचना देत आहेत. आपल्याला प्रचंड मोठी लढाई लढायची असून कोणी आपल्या अस्तित्वाला आव्हान देत असेल, विश्वासघात करत असेल तर त्याला तसेच उत्तर दिले पाहिजे. आपल्याला मोठा अॅटॅक केला पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर द्या. मी तुमच्यामागे ताकदीने आणि खंबीरपणे उभा आहे. ‘अरे ला कारे’च करायचं.. ‘अरे ला कारे’ मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी या क्लीपमध्ये म्हटले आहे.

मात्र, भाजपाने या ऑडिओ क्लीपमध्ये फेरफार करण्यात आल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लीपची दखल घेऊन निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी उद्धव यांनी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणे हे त्यांना शोभणारे नाही. हे त्यांच्या पदाला काळीमा फासण्यासारखे असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!