Share

उद्धव ठाकरेंनी केले जितेंद्र आव्हाडांचे कौतुक, म्हणाले…

Published On: 

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांची प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या तीन हजार 894 घरांची सोडत आज (ता. १) करण्यात आली. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सोडत जाहीर केली. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अस्लम शेख आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे तोंडभर कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘जितेंद्र पूर्वी टीव्हीवर बघायचो, तेव्हा हा काय बोलतोय कशाला टीव्हीवर बोलतोय, कळायचं नाही. आता जवळ आल्यावर कळले ते कसे आहेत. गिरणी कामगार, मराठी माणूस ठाकरेच्या हृद्यातला विषय आहे. गिरणी कामगार तेव्हा रस्त्यावर उतरला नसता तर मराठी माणसाला मुंबई मिळाली नसती. मुंबईसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. हे तुमचं ऋण आहे, त्यातून मुक्त मी होऊ शकत नाही, मुख्यमंत्री म्हणून नाही मी आलोय, किती केलं तरी कमीच असेल.

ते पुढे म्हणाले, ‘तुमच्यामुळे आज आम्ही आहोत, त्यामुळे जर आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात नतद्रष्ट म्हणून नोंदला जाईन, म्हणून हे सगळं करायचं आहे म्हाडातर्फे गिरणी कामगारांना घरे दिली जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतानाच मंत्री आव्हाड यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

घरांची किंमत वाढली असली तरी या काढलेल्या सोडतींची घरे साडे नऊ लाखचं असेल. मिळालेली घरे विकणार नाही असे वचनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी गिरणी कामगारांकडे मागितले. घरे तुमच्यासाठी देतोय,एकही घर विकायच नाही, रक्त सांडऊन मिळवलेली मुंबई आपली आहे, विकून जाऊ नका ! शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!