Share

अजित पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वाची बैठक, आघाडीतील कुरबुरीवर चर्चा ?

Published On: 

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वीच काँग्रेस नेत्यांनी सत्तेत सहभागी असलो तरी निर्णय प्रक्रियेत डावललं जात असल्याची भावना उघड बोलून दाखवली होती. आता अशीच तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून देखील येत असल्याची बातमी समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधी निर्णय प्रक्रियेत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे.

चीन्यांचे धाबे दणाणले : पंतप्रधान मोदी कानोकान खबर न लागू देता थेट लेह मध्ये दाखल

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे. परस्पर लॉकडाऊन वाढवल्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर काल संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची बैठक झाली. लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती माहिती आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची आता प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता आहे.

भारताला मोठं यश ! १५ ऑगस्टला येणार ‘मेड इन इंडिया’ कोरोना लस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!