Share

चीन्यांचे धाबे दणाणले : पंतप्रधान मोदी कानोकान खबर न लागू देता थेट लेह मध्ये दाखल

Published On: 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह-लडाखला पोहचले. सीमेजवळील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी लडाखला गेले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपली भेट स्थगित केल्याच्या दुसऱ्याच दिवसाशी पंतप्रधान मोदींनी अचानक सीमेवर भेट दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव बिपीन रावत हे देखील लेह दौऱ्यावर आहेत.

LAc वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे. भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष वाढला आहे. LAC वरील सैन्य माघारीदरम्यान, विश्वासघाती चीनने 15 आणि 16 जूनच्या रात्री केलेल्या भेकड कृत्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने चीनसोबत आर्थिक व्यवहार हळूहळू कमी करण्याची करुन नाकेबंदी करण्याची तयारी केली आहे. त्याआधी भारताने चीनचे 59 अॅप्स बंद करुन झटका दिला आहे.

भारताला मोठं यश ! १५ ऑगस्टला येणार ‘मेड इन इंडिया’ कोरोना लस

दरम्यान, दोन्ही देशांमधील बऱ्याच मुद्द्यांवर एकमत होत नाही आहे. गलवान खोऱ्यातून माघार घेण्यासाठी निश्चित केलेल्या पॅरामीटर्सशी चीन जवळजवळ करार करीत आहे, पण दोन्ही देश पॅंगोंग लेक जवळील सैन्य मागे घेण्यास तयार नाही आहेत. भारतीय सेना फिंगर – 4 मध्ये आहे, आणि हा परिसर नेहमीच भारताच्या अखत्यारीत राहिला आहे. तर, भारतानं फिंगर -8 वर भारताने LAC असल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत मंगळवारी चुशुल येथे भारत आणि चीनी सैन्य दलात झालेल्या कॉर्पोरेशन कमांडर-स्तरावरील बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही.

प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शिका सरोज खान यांचं ७१ व्या वर्षी निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!