Share

डॅशिंग वसंत मोरे यांच्याकडे आता पुणे मनसेच्या शहराध्यक्षपदाची धुरा

Published On: 

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्यात मनसेकडून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात खांदेपालट केला असून, शहराध्यक्षपदी नगरसेवक वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील संघटन मजबूत करून सध्या फक्त दोन नगरसेवक असलेल्या मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत संख्या दोन अंकी संख्येत पोहचविण्याचे आव्हान मोरे यांच्यासमोर असणार आहे. गेल्या चार वर्षांपासून मनसेच्या अजय शिंदे हे शहराध्यक्षपद सांभाळत होते.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेले वसंत मोरे हे आक्रमक नेतृत्त्वासाठी ओळखले जातात. त्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे केली होती. याच कामगिरीमुळे वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपद सोपवण्यात आल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!