टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं होत. मात्र आता ही बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद साधण्यासाठी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक अचानक रद्द करण्याच कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
एकीकडे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काही दिवसात सुरु होणार आहे, अशातच दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर संसदेत कशा प्रकारे आवाज उठवला जावा याबद्दल या बैठकीत रणनीती आखण्यात येणार होती.
संसदेतील हिवाळी अधिविशानाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत आता काय ठरतं? काय चर्चा होतेय ? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. मात्र ही बैठक अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधान आले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1203532200936800256?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203526855585718273?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1203506001841930240?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

