Share

शरद पवारांनी उद्धवसाहेबांना बिना लायसन्सचे ड्रायव्हर बनवलं अन् अजित पवार कंडक्टर- गुलाबराव पाटील

Published On: 

पंढरपूर : ‘कुठलीही गाडी चालवायची असेल, मग ती मोटारसायकल असेल किंवा एसटी, त्यासाठी लायसन्स लागतं. एखादा काम करायचं असेल तर अनुभवाचं किंवा पात्रतेचं प्रमाणपत्र लागतं, पण शरद पवार साहेबांनी असं काही केलं की व्होल्वो गाडीवर बिना लायसन्सचा ड्रायव्हर बसवून दिला,’ अशा शब्दांत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्याकडं आकस्मिक आलेल्या मुख्यमंत्रिपदाचं वर्णन केलं.

ते पंढरपुरात बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून ते पडण्याच्या तारखा विरोधकांकडून दिल्या जात आहेत. मात्र, लवकरच हे सरकार दोन वर्षे पूर्ण करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मजबुतीचा दाखल देताना गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत मुख्यमंत्र्यांच्या कौशल्याचा दाखला दिला.

‘२०१९ मध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं त्याआधी कुणा साधू किंवा ज्योतिषानं सांगितलं असतं तर त्याला वेड्यात काढलं गेलं असतं. पण आज ते वास्तव आहे. ज्यानी आयुष्यात कधी मोटारसायकल किंवा गाडी चालवली नव्हती, त्यांना डायरेक्ट व्होल्वो गाडीवर बसवलं गेलं. उद्धव साहेब ड्रायव्हर झाले. अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं होतं की हा ड्रायव्हर अपघात करेल. पण तसं काही झालं नाही. मागच्या दोन वर्षांत वर्षांत अनेक वळणं आणि अडथळे आले तरी आमची तीन लोकांची गाडी बरोबर आणि सुस्साट चालतीय,’ असा दावा त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!