पंढरपुर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनसेच्यावतीनं गर्व से कहो , हम हिंदू है, असे पोस्टर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. सेनेच्या हिंदू भूमिकेवर अनेक वेळा प्रश्न केले जात असताना सेना भवनासमोर मनसेने अशाप्रकारचे बॅनर लावून एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या प्रयत्नाला स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे.
जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये, अशा शब्दात पाटील यांनी मनसेवर टीका केली आहे. मनसेने मुंबईत केलेल्या बॅनरबाजीचा गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
मनसेने स्थापनेवेळी सर्वधर्म समभावचा नारा दिला होता. पण, नंतर त्यांनी परप्रांतीयांच्या कानात मारली आणि झेंडा बदलला. पुन्हा मराठीपणा आणला. आज ते म्हणताय की गर्वसे कहो हम हिंदू है. मात्र, गर्वसे कहो हम हिंदू है असे आमचे बापजादे म्हणत होते. ही सर्व शिवसेनेचीच पिलावळ आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी मनसेवर तोफ डागली.
राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत विरोधकांची खिल्ली उडवली.
महत्त्वाच्या बातम्या
- आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का?; राम कदमांचा सवाल
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी


