सातारा : राज्यभर आता गणेशत्सवाची तयारी सुरु झाली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी आगामी काळात येणारे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होणार. यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे असं सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे असा इशाराच प्रशासनाला दिला होता. यानंतर आता साताऱ्यात पुन्हा एकदा डॉल्बीच्या मुद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
आज साताऱ्यात नवीन खरेदी केलेल्या जवळपास 1 कोटी किमतीच्या डॉल्बी सिस्टीमचे पूजन खुद्द उदयनराजे यांनी करत डाॅल्बी वाजणार असल्याचे पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उदयनराजेंनी आपल्या स्टाईलमध्ये आले रे… आले रे… आले… उदयनराजे गाण्यांवर काॅलरही उडवली. उदघाटनानंतर डाॅल्बी वाजली मात्र, उत्सवात वाजणार का याकडे आता सातारकरांचे लक्ष लागून आहे. तसेच उदयनराजे यांनी उत्सव काळात डॉल्बीबंदी उठवली पाहिजे,असे सांगत डॉल्बी वाजलीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
डॉल्बी सिस्टीम वाजवण्यावर बंदी असल्याने सिस्टीम मालक आर्थिक संकटात सापडले आहेत, असाही ते म्हणाले. सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी लाखो रुपयांची डॉल्बी सिस्टीम विकत घेतली असून याचे उद्घाटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उदयनराजेंच्या नावाने तयार करण्यात आलेले गाणे डॉल्बी सिस्टीमवर लावण्यात आले होते. उदयनराजेंनी डॉल्बीच्या तालावर थिरकत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाईंग किस देत हातवारे करत कॉलर उडवून प्रशासनाला एक प्रकारे इशाराच दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Kirit Somaiya | अनिल परबांचा रिसॅार्ट Twin Tower सारखाचं पाडणार – किरीट सोमय्या
- Ghulam Nabi Azad | “मला त्यांनी घर सोडण्यास भाग पाडलं”; आझादांनी सांगितलं राजीनाम्याचं कारण
- Rupali Patil । पुन्हा पानटपरीवर चुना लावायला बसावं लागेल, रुपाली पाटलांचा गुलाबराव पाटलांना इशारा
- Karan And Bipasha | “मला आणि करणला मुलीची अपेक्षा आहे…” ; बिपाशा बसूने शेअर केली तिच्या मनातली गोष्ट
- Dussehra Melava | शिवसेना दसरा मेळावा हायजॅक? दोन वेळा अर्ज करुनही BMC कडून परवाणगी नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

